|
View Original |
|
सुखानी जगू या, आनंदानी राहू या, प्रयत्न त्याच्यासाठी करु या (7)
आलो जगात धरुन कर्माची बेडी... आता जगात बेडी ती तोडू या
माझं-माझं जगात केलं... आता प्रभु तुझ्यासाठी जगात जगू या
स्वयं साठी जगात केल सगळं... जगासाठी काहीतरी करू या
श्वास घेताना... श्वास सोडताना... प्रभुनाम चला जोडू या
येताना जगात किती पापे केली... आता जगात दोष मूक्त होऊ या
पावले टाकीत जगात पुढेच पुढे जाऊ या... ध्येय जीवनाचे साकार आपण करु या
सतगुरू देवेंद्र घिया (काका)